अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बांधकाम साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. विलास गुंजाळ असे आरोपीचे नाव आहे. त्याला बोल्हेगाव परिसरात अटक करण्यात आली.
अक्षय सुनिल म्हस्के यांनी बांधकामासाठी लागणारे साहित्य बोल्हेगाव येथे ठेवले होते. आरोपी विलास गुंजाळ व त्याच्या साथीदारांनी म्हस्के यांचे ३६ हजार ९०० रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरुन नेले. याप्रकरणी म्हस्के यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात १९ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिली होती. फिर्यादीनंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
----------------------------