अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ईदच्या कार्यक्रमात सुरू असलेला ध्वनिवर्धक बंद करण्याची मागणी धुडकावल्याने एका तरूणाने दुसऱ्या तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हातावर, तसेच छातीवर ब्लेडने वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरूणाला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
खाटीकगल्लीत बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. ईद असल्याने तरूणांनी ध्वनिवर्धक लावला होता. सवेरा बेकरीचा मालक जीया याने तो बंद करण्यास सांगितले. मात्र, तरूणांनी त्यास नकार दिला. या रागातून जिया याने वसीम रहिमखान पठाण यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत हातावर, छातीवर ब्लेडने वार केले, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला. वसीम पठाण याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जीयाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काॅन्स्टेबल भाबड करत आहेत.
----------------------------