Loading...
कोळपेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सूर्यभान बबन कोळपे यांनी सरकारी जागा मिळकत क्रमांक २८० वर १४६२ भोगवटानुक्रमाने परवानगी न घेता गाळा बांधून त्यात अतिक्रमण केलेले आहे. तसेच निवडणूक लढविताना खोटा शौचालयाचा दाखला घेतला होता.
याबाबतचे सर्व वस्तुस्थितीजन्य पुरावे राजेंद्र कोळपे यांनी विभागीय आयुक्तांना दिले. . दरम्यान सरपंच सूर्यभान कोळपे यांनी ग्रामसेवकांना हाताशी धरून ग्रामपंचायत इतिवृत्तात खाडाखोड करून स्वत:च्या अधिकारात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पातळीवर अपात्र प्रकरणात आपल्याला फायदा होईल, असे कृत्य केले. हेदेखील राजेंद्र कोळपे यांनी विभागीय आयुक्तांना पटवून दिले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
--------------------------------
Loading...
