कुकडी सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा भारतीय संविधानानुसारच चालतो- अॅड. सुभाषदादा डांगे

श्रीगोंदा प्रतिनिधी- श्रीगोंदा तालुक्यातील काही व्यक्तींचा भारतीय संविधानावर विश्वास दिसत नाही. कायदे कोणासाठीही बदलत नसतात. कुकडी सहकारी साखर कारखाना हा भारतीय संविधानानुसार चालतो. कोणी काहीही केले तरी तो खाजगी होवू शकत नाही.. कुकडी सह. साखर कारखाना हा कालही सहकारीच होता आजही सहकारीच आहे व तो उद्याही सहकारीच राहणार आहे. यावर मला व कारखान्याच्या हितचिंतक सभासदांना विश्वास आहे अशी प्रतिक्रिया अॅड. सुभाषदादा डांगे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली.


काही दिवसांपूर्वी कुकडी सहकारी साखर कारखाना सभासदांची माहिती अद्यावत करण्याच्या नावाखाली जाचक अटी असणारे करार पत्र भरून घेत आहे आणि या करार पत्राला सभासदांनी समंती दिल्यानंतर संचालक मंडळाची मनमानी वाढणार असून सभासदांचा हक्क अबाधीत राहणार नाही. तसेच करार पत्राच्या माध्यमातून कुकडीचे खाजगीकरण करण्याचा कुंडलिकराव जगताप यांचा डाव आहे व या विरोधात आपण जागृती आभियान हाती घेतले आहे. असे घनशाम शेलार यांनी वर्तमान पत्रात जाहिर केले होते. कुकडी सहकारी साखर कारखाना ज्या करारपत्रावर सभासदांच्या सह्या घेत आहे तेच करारपत्र सहकार महर्षी शिवाजीराव ना. नागवडे सह. साखर कारखाना, राज्याचे महसुल मंत्री एकनाथराव खडसे,महाराष्ट्राचे नेते स्व. गोपिनाथराव मुंडे, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांसह महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखाने अशाच प्रकारे सभासदांकडून करार पत्र भरुन घेत आहेत. मग यांचाही उद्देश हे सर्व सह. साखर कारखाने खाजगी करण्यांचा त्यांचा डाव आहे का? घनशाम आण्णांनी कुकडी सह. साखर कारखान्यावर आरोप करताना सर्व बाजु तपासून आरोप करावा. ज्यांच्या बरोबर त्यांनी कुकडी सह. साखर कारखान्याची निवडणूक लढवली त्यांनी शेतकऱ्यांचे किती हाल केले तेही आण्णांनी एकदा पेपरला द्यावे मोगलांना सर्व ठिकाणी संताजी धनाजी दिसायचे तसे घनशाम शेलारांना सर्व ठिकाणी जगताप पिता पुत्र दिसतात. कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी मोठ्या कष्टातून हा कारखाना उभा केलेला आहे. सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यातूनच न्यायच दिलेला आहे. आजपर्यंत कोणाचाही एकही रुपया बुडवला नाही व उद्याही बुडवणार नाही.


कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या हितचितंक सभासदांची काळजी करण्यास सभासदांनी भरघोस मतांनी व विश्वासाने निवडून दिलेले संचालक मंडळ समर्थ आहे. परंतू फक्त पेपरमध्ये शेतकऱ्यांची काळजी करणाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काय योगदान दिले हे आधी सांगावे. आजही साखर आयुक्त पुणे हे कारखान्याला पत्र देवून सांगतात की, रु.५००/- चे शेअर्स धारकांचे सभासदत्व रद्द करा, परंतू कुंडलिकराव जगताप व त्यांचे सर्व संचालक मंडळाने ठरविले आहे की, आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल परंतू एकाही सभसदाचे सभासदत्व रद्द करणार नाही. आण्णांनी डोके ठिकाणावर ठेवून आरोप करावेत, पत्रकबाजी करत बसू नये, अन्यथा तुमचे संपुर्ण पितळ उघडे करणेत येईल असेही अॅड. सुभाषदादा डांगे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post