नागवडे'चे एफ आर पी चे 22 कोटी 66 लाख रुपये शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग-राजेंद्र नागवडे.

श्रीगोंदा-दि.25-(प्रतिनिधी)- 'नागवडे' कारखान्याने मागील गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसाच्या एफ आर पी दराच्या दुस-या हप्त्यापोटी प्रतिटन 401 रुपये 31 पैसे या प्रमाणे एकुण 22 कोटी 66 लाख 2 हजार 501 रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर 25 मे रोजी वर्ग करण्यात आले आहेत अशी माहीती 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली.केंद्र सरकारकडून मिळणारे प्रतिटन 45 रुपयांचे अनुदान सरकार ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात माहीती देताना नागवडे म्हणाले की,मागील गळीत हंगामात 'नागवडे' कारखान्याने 5 लाख 64 हजार 657 मे.टन ऊसाचे गाळप करीत सरासरी 11.30 एवढा साखर उतारा राखला होता.केंद्र सरकारच्या ऊस दर निश्चित धोरणानुसार 'नागवडे' कारखान्याचा गाळप केलेल्या ऊसाचा रास्त व वाजवी दर (एफ आर पी) 2 हजार 266 रुपये 31 पैसे निश्चित केला होता.यापैकी 80 टक्के रकमेचा प्रतिटन 1 हजार 820 रुपयांचा पहीला हप्ता कारखान्याने ऊस उत्पादकांना यापूर्वीच अदा केला होता.त्यावेळी कारखान्याने एकुण 102 कोटी 76 लाख 75 हजार 740 रुपये शेतक-यांना दिले होते.शेतक-यांना एफ आर पी ऊस दराचा दुसरा हप्ता 31 मे पूर्वी देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न होता.मात्र दुष्काळात शेतक-यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत संचालक मंडळाने तातडीने दुसरा हप्ता देण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केली आहे.

ऊस उत्पादकांना एफ आर पी चा दुसरा हप्ता प्रतिटन 401 रुपये 31 पैसे याप्रमाणे एकुण 22 कोटी 66 लाख 2 हजार 501 रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर 25 मे (बुधवारी) रोजीच वर्ग करण्यात आले आहेत असे सांगून नागवडे म्हणाले की,बँकेतुन शेतक-यांना 26 मे पासून पैसे काढता येतील.याशिवाय एफ आर पी दरातील उर्वरीत प्रतिटन 45 रुपये केंद्र सरकार शेतक-यांच्या बँक खात्यावर साखर निर्यात अनुदान म्हणून जमा करणार आहे.शेतक-यांना मदतीचा हात देण्यात व शेतक-यांच्या घामाचे दाम देण्यात 'नागवडे' कारखाना कधीच मागे नव्हता व यापुढेही मागे राहणार नाही असे सांगून नागवडे म्हणाले की,पाऊस पडल्यानंतर शेतकरी, सभासदांना दर्जेदार व नविन वाणाचे ऊस बेणे व रास्त दरात खते उपलब्ध करुन देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न असणार आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post