संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान अजय रामदास खैरे (वय ६) या बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. उसाच्या शेतालगत खैरे कुटुंबाचे घर आहे. खैरे हे मोलमजुरी व राखणदारीचे काम करतात. रात्री मुलगा घराच्या बाहेर खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला करुन त्याला उसाच्या शेतात नेले.यावेळी आरडाओरड झाली. माहिती मिळताच गावकर्यांनी उसाच्या शेताला गराडा घातला. बिबट्या पळून गेला. मात्र मुलाचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रात्री सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. आठ दिवसापूर्वीही येथे एका तीन वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला होता.
