अगस्ति कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयाचे 12 वी परिक्षेत नेत्रदीपक यश

प्रतिनिधी | अकोले,
येथील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ति कला , वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील तीनही शाखांचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ( १२ वी ) चा निकाल कला शाखाचा ( ७५ . ६० टक्के ), वाणिज्य शाखेचा ( ९८ . ६९ टक्के ) व विज्ञान शाखेचा ( ९५ . ६६ टक्के ) लागला असून या महाविद्यालयातील विद्यार्थानी नेत्रदीपक कामगिरी केली आहे . 
. विद्यार्थानी शाखानिहाय मिळवलेलं यश याप्रमाणे आहे. कला शाखा, प्रथम पोपेरे सोमनाथ पुंजा, ७६ टक्के, द्वितीय, गोडे रवींद्र संजय, ७५ .६९, तृतीय, कोकतारे भाऊसाहेब नामदेव, ७५ . ३८ टक्के. वाणिज्य शाखा , प्रथम, कु .चासकर पुष्पलता नामदेव , ८०.४६ कु . देशमुख दीप्ती नामदेव , ८०.४६ द्वितीय , भांगरे प्रतीक बाळासाहेब , ७९ .२३. तृतीय , कु . धुमाळ अक्षता शंकर , ७९. ०७. विज्ञान शाखा , प्रथम , कु . चौधरी स्नेहल संपत , ८९.३८, द्वितीय , मांडे आकाश दत्तात्रय , ८१.२३, तृतीय , इपकल प्रथमेश रवींद्र , ७९.३८.
निकालाची उज्जवल परंपरा महाविद्यालयाने कायम राखली असून, यशस्वी तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त, माजी मंत्री मधुकरराव पिचड , कायम विश्वस्त प्रेमानंद रुपवते, सीताराम पाटील गायकर, आमदार वैभवराव पिचड, अध्यक्ष जे. डी. आंबरे पाटील , उपाध्यक्ष मधुकर सोनवणे , सेक्रेटरी यशवंतराव आभाळे , सहसचिव अँड. भाऊसाहेब गोडसे , खजिनदार एस् . पी . देशमुख तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य , प्राचार्य डॉ . संजय ताकटे , उपप्राचार्य पी. आर. जगताप , पर्यवेक्षक डॉ . सुनील शिंदे , औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .
Post a Comment (0)
Previous Post Next Post