भाडेकरूनेच केली घरमालकाच्या घरी चोरी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरामध्ये सातत्याने घरफोड्या होत आहे. पाच दिवसांपूर्वी नगर शहरामध्ये एक बंद घरफोडून चोरट्यांनी दागिने चोरून नेले होते. पोलिस तपासानंतर भाडेकरूनेच घरमालकाच्या घरी चोरी केल्याचे उघडकीस आले. कोतवाली पोलिसांनी या भाडेकरूला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले १८ तोळे सोने, पाच तोळे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.


रवींद्र शंकर ताडीकोंडा असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता बुधवार (२ जानेवारी)पर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. ताडीकोंडा याने गौरीघुमट परिसरातील आनंदीबाजार येथे व्यंकटेश रामैय्या बुरा यांची रुम भाडेतत्वावर घेतली होती. बुरा हे कुटुंबासह हैदराबाद येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्या दरम्यान चोरट्याने त्यांचे घरफोडून सोने, चांदीचे दागिने चोरून नेले होते. बुरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Previous Post Next Post