घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने पळवले.

बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना नगर- मनमाड रोडवरील बोल्हेगाव फाटा येथे सोमवारी दि.३१ ते मंगळवारी दि.१ च्या दरम्यान घडली. 


अहमदनगर लाईव्ह : याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्रतीक अरविंद कांबळे रा. बोल्हेगावफाटा अहमदनगर. यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सामानाची उचकापाचक केली. व बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून 

६६ हजार रुपये किंमतीचे सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. याबाबत प्रतीक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक गाजरे हे करीत आहेत..
Previous Post Next Post