युवकास मारहाण करून लुटले.

अहमदनगर लाईव्ह :- मित्रांसह बोलत असताना पाच जणांच्या जमावाने तरुणीची टर उडविण्याचा बहाणा करीत २१ वर्षीय युवकास मारहाण करून मध्यस्थी करण्यास गेलेल्या सहकाऱ्याला मारहाण करून त्याच्या खिशातील २३०० रुपये रोकड काढून घेतले तसेच मोबाईल तोडून नुकसान केले. 


ही घटना गुरुवारी दि. २७ डिसेंबर रोजी वाडीयापार्क समोर घडली.याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, स्वप्निल शशिकांत नजन रा. स्टेशन रोड, शिवनेरी चौक, अहमदनगर. हा त्याचा मित्र आकाश तोडमल हे एका तरुणीसह बोलत उभे होते.

त्यावेळी तेथे किशोर शहाजी थोरवे रा. बुरूडगांव रोड., अरुण श्रीरामचंद्र पटेल, रवी प्रेमलाल आदिवासी, अनिषकुमार श्रीरामभजन नामदेव पोपट वैरागर रा. अहमदनगर. हे तेथे आले आणि नजन याच्याबरोबर असलेल्या तरूणीस छेडछाड केली. त्यावर नजन याने त्यांना जाऊ द्या असे म्हटल्याचा राग आल्याने पाच जणांनी नजन यास मारहाण केली. त्यावेळी नजनचा मित्र भांडण सोडवण्यास आला असता पाच जणांनी दोघांनाही लाकडी दांडक्याने,व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. 

तसेच तोडमल याचे खिशातील २३०० रुपये रोख रक्कम काढून घेतली व नजनचा मोबाईल तोडून नुकसान केले याबाबत स्वप्निल नजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
Previous Post Next Post