श्रीगोंदा दि २५ शहर प्रतिनिधी -श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव , आर्वी बेटात बेसुमार वाळू उपसा सुरु असून दोन दिवसापूर्वी या वाळू उपश्या बाबत दैनिक प्रभात ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले मात्र या वाळू उपष्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे न उमलगणारे कोढे आहे या बेटात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरु आहे
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव , आर्वी बेट हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते या बेटाला चारही बाजूने पाण्याचा वेढा असतो मात्र या वर्षी भीमा नदी पात्रात पाणी नसल्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे या गावातील वाळू तस्कर रात्र दिवस मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा चालू असतो या गावातील काही जन नदी व वाळू म्हणजे स्वतःची मक्तेदारी असल्यासारखे वागतात या गावातील काही मंडळींनी आपले पाहुणे हि वाळू उपसा करण्यासाठी गावात जमा केले आहेत तसेच या गावातील वाळू तस्करांना तालुक्यातील बड्या नेत्याचा आशीर्वाद असल्यामुळे येथे राजरोस वाळू उपसा चालू आहे या उपश्याकडे महसूल व पोलिस प्रशासन हि जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत हेही इतर कारवाया वरून दिसून येते
येथील वाळू उपश्यावर मागच्या दोन वर्ष्यापूर्वी तत्कालीन तहसीलदार डॉ विनोद भामरे यांनी मोठी कारवाई केली होती त्या कारवाई नंतर या ठिकाणी अद्यापपर्यंत एकही कारवाई महसूल ने केलेली नाही त्यामुळे येथील तस्करांचे व महसूल पोलिसांचे काहीतरी आर्थिक तडजोडी असल्याचे दिसून येत
पेडगाव मध्ये दौंड तालुक्यातील महसूल यंत्रणा कारवाई करतात पण श्रीगोंदा तालुका महसूल यंत्रणा पेडगाव मध्ये काहीच कारवाई का ? करत नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे
*****
प्रांत अधिकाऱ्यांना बदलीचे वेध
वाळू तस्करांवर कारवाई करण्यात तरबेज असणारे श्रीगोंदा पारनेर चे प्रांत अधिकारी संतोष भोर यांनी सुरुवातीच्या काळात वाळू वर मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या होत्या पण गेल्या काही महिन्यापासून भोर यांनी कारवाई केली नाही फक्त तोंडी आदेश देवून कारवाई करण्यास सांगीतले या च्या पलीकडे कोणतीही मोठी कारवाई केलेली नाही त्यात त्यांना बदलीचे वेध लागले असल्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे