श्रीरामपूर [प्रतिनिधी] भुसावळ येथील प्रसिद्ध हाडवैद्य व हाडांचे जादुगार हाजी रज्जाकभाई व सहकारी संच ह्यांची टीम श्रीरामपुरात वर्षातून एकदा येत होती.परंतु लोकाग्रहास्तव व रोटरी क्लब श्रीरामपूर यांच्या सौजन्याने व अनेक मणक्यांचे,हाडांचे आजारी रुंग्ण यांचे आग्रहास्तव दि २२ मे ते २८ मे पर्यंत सिद्धार्थ हॉटेल श्रीरामपूर येथे पुन्हा येऊन जिल्ह्यातील,आणि दूरवरून आजारी पेशंट हाजी रज्जाकभाई यांच्या टीमकडून उपचार घेत आहेत.३१ मार्च ते ६ एप्रिल पर्यंत उपचार केंद्र आयोजित केले होते.असंख्य आजारी स्त्री पुरुषांनी उपचार व अनुभव घेतल्यानंतर अनेकांना आपल्याला गुण आला.बराच फरक पडला तुम्ही पण अनुभव घ्या असा सल्ला उर्वरित पेशंटला देण्यात आला त्यामुळेच हाजी रज्जाकभाई प्रसिद्ध हाडवैद्य यांना आमंत्रित करण्यात आले.विना ऑपरेशन विना औषधी असे प्रभावशाली आयुर्वेदिक पद्धतीने सर्वसामान्यांना परवडेल अशा अल्प दरात उपचार केले जात आहेत.म्हणूनच गर्दी वाढतच आहे.आता फक्त शेवटचे दोन दिवस राहिले असल्याने मानदुखी,गुडघेदुखी,पाठदुखी,एनकोलायसीस,कंबरदुखी,टाचदुखी,अशा हाडांचे आजारी पेशंट यांनी त्वरित श्रीरामपूर येथे सिद्धार्थ हॉटेल येथे येऊन या उपचार केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन हाजी रज्जाकभाई यांनी केले आहे.त्यांचा ५ पिढ्यापासून या कार्यात मोठा मोलाचा वाटा आहे.अनेक ठिकाणी पेशंट त्यांना धन्यवाद देऊन उपचार केंद्र जेथे असेल त्या शहराचे मुख्य विविध संस्थांचे पदाधिकारी त्यांचे स्वागत व अभिनंदन करून सत्कार करीत आहेत.ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील रुंग्णावर उपचार करीत आहेत ही गौरवाची बाब आहे.सर्वांनाच भुसावळ जाणे व तेथे उपचार घेणे हे शक्य नसते म्हणून श्रीरामपूर परिसरातील आजारीची सुविधा दूर व्हावी या हेतूने श्रीरामपूर येथे उपचार सुरु आहेत.पैगंबरवासी हाजी समदअली हे मसाज मास्टर होते.त्यांचे नाव देशात होते त्यांचेकडूनच आम्हाला हे शिक्षण मिळाले व यशस्वी झालो असे रज्जाकभाई यांनी सांगितले.श्रीरामपूर येथील मर्चंट असोसिएशन अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार श्री रमण मुथा,नगरसेवक दत्तात्रय साबळे,शिवसेना नेते अशोक थोरे,प्रकाश बोकन आदींनी अभिनंदन व सत्कार केला.मा.आ.ज.य.टेकावडे यांनी आमंत्रित केल्यापासून १९९८ पासून श्रीरामपुरात उपचार होत आहेत.आता तर अनेकांनी आग्रही मागणी केली की श्रीरामपूर येथे प्रत्येक महिन्याला असे उपचार केंद्र रज्जाकभाई यांनी सुरु ठेवावे.त्यांनीही संमती दिली.