श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा छाया गोरे यांचा अखेर राजीनामा

श्रीगोंदा :- श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा छाया गोरे यांनी काल जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला राजीनामा दिला. जिल्हाधिकारी नाशिक येथे मिटींगसाठी गेले होते.छाया गोरे यांनी नाशिक येथे जाऊन आपला राजीनामा काल सांयकाळी सात वाजता त्यांच्याकडे सादर केला.

छाया गोरे दि. ३ फेब्रुवारी २०१४ रोजी नगराध्यक्ष झाल्या होत्या. त्या वेळी राष्ट्रवादीचे दहा आणि काँग्रेसचे नऊ नगर सेवक निवडून आले होते.३ फेब्रुवारी २०१४ ते २ फेब्रुवारी २०१६ पर्यंत अडीच वर्षे नगराध्यक्ष पद महिलासाठी राखीव होते. छाया गोरे, अर्चना गोरे व सुनिता शिंदे यांना प्रत्येकी दहा महिने संधी देण्याचा निर्णय श्रेष्ठींनी घेतला होता. परंतु तो निर्णय त्यांना पाळता आला नाही.छाया गोरे यांनी दहा महिन्याऐवजी २७ महिने नगराध्यक्ष पद भोगले. नाराज होऊन अर्चना गोरे दुरावल्या. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीशी जवळीकता साधली.

आता उरलेल्या तीन महिन्यासाठी एम.डी. शिंदे यांच्या पत्नी सुनिता शिंदे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. गट बांधणीमुळे प्रत्येक नगर सेवकाला कायदेशीर पावले टाकावी लागणार आहेत अन्यथा एखाद्या नगर सेवकाला आपले पद गमवावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.एक दोन दिवसात नव्या निवडीची तारीख जाहीर होऊन २ जून २०१६ च्या दरम्यान नवीन नगराध्यक्षाची निवड होईल
Post a Comment (0)
Previous Post Next Post