
तळेगांव दिघे (प्रतिनिधी ) - माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांनी दुष्काळ निवारण कामे केलेल्या सहकार्याच्या अहवानास प्रतिसाद देत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तळेगांव गटात नद्या, नाले व बंधार्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरु केली आहे.
लोहारे व कदमवाडी येथे बंधारे रुंदीकरण व खोलीकरण कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे,संपतराव गोडगे, बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, अशोक थोरात, सरपंच रुपाली देशमुख, अरुण पोकळे, शांताराम कदम, संपत पोकळे, बाळासाहेब पोकळे, दिलीप पोकळे,कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर ,भास्कर पानसरे, शेखर वाघ, आदि मान्यवर उपस्थि होते. तालुक्यातील चिंचोली गुरव व माळेगाव हवेली येथेही नद्यांचे रुंदीकरण, गाळ काढणे, नाले दुरुस्तींची कामे कारखान्याच्या वतीने सुरु झाली आहे.
संगमनेर तालुक्यात आ.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली एक तालुका, एक परिवार ही संकल्पना प्रभावीपणे राबविली जात आहे. आ.थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गावोगावी सिमेंट बंधारे, जलसंधारणाची कामे , गावतळी यासंह कायम स्वरुपी दुष्काळ निवारण्यासाठी विविध उपाययोजना सातत्याने राबविल्या आहे. यावर्षी त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत तळेगाव व निमोण गटात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याने जलसंधारणासाठी पुढाकार घेवून तखदुष्काळी गावांमध्ये नद्यांचा गाळ काढने, नाले रुंदीकरण आदि जलशिवाराची कामे सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाने ही साखर कारखान्यांनी जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले होते. हवामान खात्याने यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने या कामांमधून शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. कारकान्याने ायापुर्वीही भोजापूर चारी रुंदीकरण , विविध तलांवांमधील गाळ काढणे, गावतळी निर्माण करणे अशी मोठ मोठी कामे केली आहेत. कारखान्याचे चेअरमन अॅड.माधवराव कानवडे,उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे व सर्व संचालक मंडळाने हा सेवाभावी उपक्रम तातडीने केला आहे.
यावेळी संपतराव गोडगे म्हणाले कि, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली तालुक्यात दुष्काळ निवारणाचे मॉडेल काम सुरु असून दुष्काळ निवारणात कारखाना, दूध संघ, शेतकरी संघ, मार्केट कमिटी यांसह विविध सहकारी संस्था, सामाजिक प्रतिष्ठानेही महत्वपुर्ण योगदान देत आहे.तर बाबा ओहोळ रायात दुष्काळाची परिस्थिती भीषण असून पुढील काळात पाणी बचत हीच पाणी निर्मीती ठरणार आहे. गावातील बंधार्यांचे रुंदीकरण केल्याने पुढील काळात येथे पावसाचे पाणी साचून पाण्याचा मोठा साठा झाल्याने परिसरातील विहरींना पाणी उतरुन पाण्याची अडचण दूर होणार आहे. याप्रसंगी ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळेगांव भागातील नागरीकांनी आ.बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखालील थोरात कारखान्याच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.