अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी सकाळी भारतीय जनता पक्षाची बैठक

प्रतिनिधी | अकोले,भारतीय जनता पक्षाचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या कारभाराला गुरुवारी ( 26 मे ) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराच्या दोन वर्षातील कार्यपूर्तीचा गौरव करण्यासाठी अकोले तालुका भारतीय जनता पक्षाची तालुकास्तरीय बैठक शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व अकोले तालुका भाजपचे अध्यक्ष सीताराम भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह, अकोले येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे, अशी माहीती भाजपचे तालुका सरचिटणीस रमेश राक्षे यांनी दिली. 


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरकारला आपल्या 50 वर्षाच्या कार्यकाळात जे निर्णय घेऊन काम करणे शक्य झाले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दोन वर्षांत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकारच्या सत्तेवरील येऊन दोन वर्ष यशस्वी कारकीर्द पुर्ण झाल्याबद्दल तालुक्यात विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे ,शिवाजीराजे धुमाळ, अॅड. वंसतराव मनकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लाहमटे, सौ. सुनिता भांगरे, सीताराम भांगरे, दिनेश शहा उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला अकोले तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक ,रमेश राक्षे, नानासाहेब दळवी यांनी केले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post