संगमनेरकरांनी जागविल्या स्व.विलासराव देशमुख यांच्या आठवणी

तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व.विलासराव देशमुख यांची जयंती साजरी .


संगमनेर (प्रतिनिधी ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सतत हसतमुख असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व स्व.विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जयंती साजरी करुन त्यांच्या स्मृती जागविल्या. 
           माजीमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा ओहोळ,अजय फटांगरे,सौ.निर्मलाताई गुंजाळ,डॉ.नामदेव गुंजाळ,विलास कवडे,अशोक हजारे,कन्हैय्या कागडे, ढोले गुरुजी,प्रा.बाबा खरात,चंद्रकांत कडलग,किरण कानवडे,पुंजाजी दिघे,नामदेव कहांडळ,भास्कर खेमनर,विजय हिंगे,गोरख वर्पे,अनिल सोमणी आदि मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी स्व.विलासरावजी देशमुख यांना अभिवादन करण्यात आले.
               महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आठ वर्षे समर्थपणे सांभाळणारे स्व.विलासराव देशमुख यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम केले.संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी कायम आमदार थोरात यांना पाठिंबा दिला.बाभूळ गावचे सरपंच ते मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असा जिवन प्रवास असणार्‍या स्व.विलासराव देशमुख यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाने रायभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. काँग्रेस पक्षासाठी मोठा जनाधार मिळविला.यांची स्मृती संगमनेरकरांनी कायम जपली आहे.
याप्रसंगी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर शहरासाठी निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याची थेट पाईप लाईन योजनेची संकल्पना स्व.विलासराव देशमुख यांनी दोनच मिनिटांत मंजूर करुन आमदार थोरात यांच्या दुरदृष्टीचे कौतूक केले. यामुळे भर उन्हाळ्याात संगमनेर शहराला स्वच्छ पाणीपुरवठा झाला आहे. संगमनेर तालुक्यावर त्यांनी कायम प्रेम केले.त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाची उणीव महाराष्ट्राला भासत आहे.
                यावेळी बाबा ओहोळ म्हणाले कि, काँग्रेसला या काळात त्यांच्या नेतृत्वाची गरज होती. कार्यकर्त्यांना प्रोत्साहान देणार्‍या या नेत्याच्या अकाली जाण्याने काँग्रेसमध्ये कायमची मोठी पोकळी निर्माण झाली आहे संगमनेर मध्ये काँग्रेस पक्षाचे संघटन भक्कम असून येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकानी ही पक्ष संघटनेत अधिक योगदान दिले पाहिजे.आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेत्वृत्वाखाली संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे.यापुढे ही सर्वांनी विकासाच्या पाठिशी उभे रहावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सतिष शेजवळ,प्रविण पानसरे,बाळासाहेब हांडे,अजित मोकळ,विशाल काळे,संदिप भागवत, सुजित पंधारे,बबन खेमनर, आदिंसह काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post