वाळू तस्काराकडून महिला तहसीलदारांच्या वाहनाचा थरारक रित्या पाठलाग .

 श्रीगोंदा ( शिवाजी साळुंके ) श्रीगोंदा तालुक्याच्या महिला तहसीलदार वंदना खरमाळे या महसूल पथकासह हिरडगाव फाटा मार्गे भीमा नदी पात्राच्या दिशेने खाजगी वाहनातून जात असताना श्रीगोंदा शहरातून एक वाळू तस्कर त्यांचा थरारक रित्या पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले . तहसीलदार यांचे वाहनाने रस्ते बदलल्या नंतरही हा वाळू तस्करांचा खबऱ्या वाहनांचा पाठलाग करीत होता आणि त्याच्या मोबाईल मधून तहसीलदार कोणत्या दिशेने जात आहेत याचे लोकेशन देत असल्याने तहसीलदार यांच्या लक्षात आल्याने तहसीलदार यांनी गाडी थांबून या तरुणाची माहिती घेतली असता हा तरुण एका अनोळखी वस्तीवरील घरात घुसत असताना त्याला पकडण्यात आले

.

                श्रीगोंदा शहरातील तहसील कार्यालयाच्या आवारात वाळू तस्करांचे पंटर बसून तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी कोणत्या दिशेने जात असतात याचे लोकेशन थेट नदी पात्रात देत असतात मात्र काल संध्याकाळी तहसीलदार वंदना खरमाळे, नायब तहसीलदार दुर्गे , मंडळ अधिकारी शिंगाडे , तलाठी लक्ष्मण गरड हे तहसील कार्यालयासामोरून एका खाजगी वाहनात बसून घोडेगाव मार्गे जात असताना त्यांच्या वाहनाचा एक तरुण दुचाकी वरून पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले त्यानी हा तरुण थरारक रित्या पाठलाग करीत असून मोबाईल वर कुणाला तरी माहिती देत असल्याचे लक्षात आल्यानंतर तहसीलदार यांनी वाहन दुसऱ्या रस्त्याने वळवले मात्र या रस्त्याने पण हा तरुण मागे मागे येत असल्याचे लक्षात आल्याने तहसीलदार यांनी वाहन थांबून या तरुणाच्या दिशेने गाडी वळवली तर हा तरुण एका अनोळखी घरासमोर थांबून पाणी मागत होता या घरात चौकशी केली असता या तरुणाचा कोणताही संबंध नसल्याचे लक्षात आले त्या ठिकाणी या वाळू तस्कर तरुणाची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने या तरुणाला पकडण्यात आले या तरुणाची बोलण्याची भाषा दमदाटीचीची आणि माझे कुणी काही करणार नाही अशी पहिल्यांदा होती मात्र नंतर हा तरुण नरमाईच्या भाषेत बोलू लागला श्रीगोंदा पोलिसाच्या ताब्यात दिल्यावर तो काहीच बोलत नव्हता मात्र तहसीलदार यांचा पाठलाग केवळ नदी पात्रात कारवाई करून वाहने पकडू नये यासाठी देत असल्याचे सांगण्यात आले .वंदना खरमाळे यांनी पथकासह स्वता पोलिस स्टेशन मध्ये येउन याबबत पोलिस उपनिरीक्षक अशोक उकिरडे याना याबबत माहिती दिली या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली .
 या तस्कराचे नाव ही खोटे                 तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या या तरुणाने त्याला पकडल्या नंतर स्वताचे नाव पोपट गंगाराम बोरुडे असे सांगितले तर पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिल्या वर या तस्कराला भेटण्यासाठी आलेल्यानी त्याचे नाव संदीप राउत असल्याचे सांगितल्याने या तरुणाचे नेमके खरे नाव काय याचा तपास पोलिस उशिरापर्यंत करीत होते पोलिस स्टेशनच्या आवारात या वाळू तस्कराला भेटण्यासाठी मोठ्या संख्हेने गर्दी झाली होती
Post a Comment (0)
Previous Post Next Post