लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना गावोगावी राबविण्याची गरज : आ. जगताप

कर्जत  - भीषण दुष्काळी परिस्थितीत देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गुंड यांनी प्रभावीपणे विकास कामे केली आहेत. लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजना गावोगावी राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. राहुल जगताप यांनी केले. तालुक्यातील जलालपूर येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राजेंद्र गुंड, राष्ट्रवादी कॉंगे्सच्या महिला अघाडीच्या जिल्हा अध्यक्षा माधुरी लोंढे, पंचायत समितीच्या सदस्या सोनाली बोराटे, सरंपच रोहिणी काळे, उपसरंपच किसन कासारे, नागनाथ जाधव, जीवन खिलारे, देविदास गावडे, चंागदेव मेरगळ, दत्तात्रय पवार, बापू खुरंगे, धनंजय काळे, शिवदास झगडे, नेताजी पालकर,भागवत धालवडे, सारंग नलगे, चिंतामण सांगळे, शहाजी कदम,पचांयत समितीचे कृषी अधिकारी रूपचंद जगताप, देविदास काकडे आदी उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post