पारनेर -प्रतिनिधी :- मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील सावरगाव फाट्यावर कर्जुले हर्या कडे येत असताना दुचाकी चालविणार्या महिलेचा तोल गेल्याने व डोक्यावरुन गाडी गेल्याने ती जागीच ठार झाली .अपघातग्रस्त महिलेचे नाव लक्ष्मीबाई संतोष गवळी वय-30 राहणार -निमगाव सावा तालुका -जुन्नर असे आहे. यासबंधीची फिर्याद सुरेश गेणुभाऊ गवळी , कर्जुले हर्या ता-पारनेर यांनी दिली आहे. या घटनेतील मयत महिला ही आपल्या स्कुटरवरून नगर कल्याण महामार्गावरून कर्जुले हर्या कडे चालले असताना सावरगाव फाट्यावर या स्कुटरला पाठीमागुन अज्ञात वाहनांने धडक देवुन तो निघुन गेला.त्यामुळे या रस्त्यावर पडल्याने दुसरी गाडी डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यु झाला. टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.या घटनेची पुढील तपास पो.हेड.काॅन्स्टेबल शेलार करत आहेत .