१२ वीचा निकाल जाहीर - पुणे विभागात नगर तिसर्‍या क्रमांकावर जिल्ह्याचा निकाल ८७.१२ टक्के

शहर प्रतिनिधी :- बारावीचा निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन प्रसिद्ध झाला. बारावीच्या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यातील ३६८ विद्यालयांमधून सुमारे ५८ हजार ५३५ विद्यार्थी बसले होते. यातून ५0 हजार ९९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा ९४.७६, वाणिज्य शाखेचा ७५.७१ व कला शाखेचा ९0.७८ टक्के निकाल लागला आहे. एमसीव्हीसीचा निकाल ८0.८२ टक्के लागला आहे.              गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्क्यांनी निकाल घसरला आहे. मुलींनी बारावीतले अव्वल स्थान कायम राखले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणही घसरले आहे. गेल्या वर्षी ९५.७0 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या होत्या. तर या वर्षी हेच प्रमाण ९२.४६ टक्क्यापर्यंत घसरले आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील तब्बल ३५ विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला होता. यंदा १00 हे प्रमाण दुपटीने कमी झाले आहे. यंदा केवळ अठरा विद्यालयांचाच निकाल १00 टक्के लागला आहे.
              २४ हजार २१0 मुलींपैकी २२ हजार ३८५ मुली उत्तीर्ण झाल्या असून . ३४ हजार ३२५ मुलांपैकी २८ हजार ६१२ मुले उत्तीर्ण झाली. सर्वाधिक मुली संगमनेर व कोपरगाव तालुक्यांतून उत्तीर्ण झाल्या. कोपरगावमधून ३ हजार ७५५, तर संगमनेरमधून २ हजार ८८३ मुली उत्तीर्ण झाल्या. याच तालुक्यातून मुले सर्वाधिक उत्तीर्ण झाले आहेत. कोपरगावमधून ४ हजार ३४१, तर संगमनेरमधून ३ हजार ५३१ मुले उत्तीर्ण झाले आहेत. जामखेड तालुक्यातील सर्वाधिक कमी मुले व मुली उत्तीर्ण झाली आहेत. मुले १ हजार ४७, तर मुली ६५0 उत्तीर्ण झाल्या आहेत. .
 

शाखा .परीक्षार्थी. विद्यार्थी. उत्तीर्ण विद्यार्थी
विज्ञान : २८ हजार ९७ २६ हजार ६२५

कला : २0 हजार ७८७ १५ हजार ७३७

वाणिज्य : ८ हजार ४८0 ७ हजार ६९८

तालुका निहाय निकाल टक्केवारी पुढीलप्रमाणे -
 
कर्जत ९१.७८
संगमनेर ९१.७१
राहाता ८९.८४
जामखेड ८९.२२
पारनेर ८९.११
अकोले ८८.८0
पाथर्डी ८८.७९
श्रीगोंदा ८८.६९
राहुरी ८७.१0
कोपरगाव ८६.७१
नगर ८५.६६
शेवगाव ८३.६६
श्रीरामपूर ८२.९६
नेवासा ७८.३४
Post a Comment (0)
Previous Post Next Post